धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून | college girl who kidnapped from viman nagar area murdered by friend for ransom(संग्रहित दृश्य.)

मुलगा बेपत्ता झाल्याचा बनाव

गेल्या काही दिवसांपासून माधव पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्याला माहिती-तंत्रज्ञान कंपनीतून २ महिन्यांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला. माधव खराडीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मध्यरात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने दारू प्यायल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडे मुलाबाबत विचारणा केली. तेव्हा हडपसर भागातून मुलगा बेपत्ता झाल्याची बतावणी केली. पोलिसी खाक्या दाखविताचा त्याने मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची कबुली दिली. मुलाचा मृतदेह नगर रस्त्यावरील मोकळ्या जागेत टाकून दिल्याचे त्याने सांगितले. एका दुकानातून त्याने चाकू आणि ब्लेड खरेदी केले होते. मुलाचा खून करून तो लॉजमध्ये पहाटे झोपायला आला होता. आरोपी माधव टिकेटी पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. चारित्र्याच्या संशयातून त्याने स्वत:च्या ३  वर्षांच्या मुलाचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.