बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासूबाई इंदिरा भादुरी यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. इंदिरा भादुरी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून इंदिरा भादुरी यांची प्रकृती ठीक नव्हती आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. अशी माहिती ही समोर येत आहे. इंदिरा भादुरी यांच्या जाण्याने बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इंदिरा भादुरी यांची तब्येत मंगळवार रात्री अधिकच बिघडली होती त्यामुळे अमिताभ बच्चन तडकाफकडी भोपाळच्या दिशेने रवाना झाले. जया बच्चनही भोपाळमध्ये पोहचल्या होत्या. पण आजाराशी इंदिरा भादुरी यांची झुंज अपयशी ठरली आणि भोपाळमधील रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(संग्रहित दृश्य.)
अभिषेक आणि श्वेता बच्चन आजीच्या खूप जवळ होते.
इंदिरा भादुरी यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. ही बातमी समजताच बच्चन कुटुंबावर शोककळा पसरली. सगळ्यात आधी अभिषेक बच्चन आजीच्या घरी पोहोचला. अमिताभ बच्चन आणि कुटुंबातील इतर सदस्य चार्टर्ड विमानाने भोपाळला पोहोचत असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिषेक आणि श्वेता बच्चन त्यांच्या आजीच्या खूप जवळ होते. जया बच्चन यांचे आई-वडील मध्य प्रदेशातच दीर्घाकाळापासून वास्तव्यास होते. जया बच्चन यांचाही जन्म मध्य प्रदेशात झाला. जया बच्चन यांना आणखी दोन बहिणी आहेत, ज्यांची नावे रीटा आणि नीता आहेत. रिटा यांनी अभिनेता राजीव वर्माशी लग्न केले. जया बच्चन यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्या लहान वयातच सिनेक्षेत्रात आल्या होत्या. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सत्यजित राय यांच्या महानगर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. जया बच्चन यांनी आपल्या करिअरमध्ये उपहार, त्रयश आणि कोरा कागज या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत जंजीर, अभिमान, चुपके चुपके आणि शोले असे अनेक चित्रपट केले.