रोहित पवार यांच्याबाबत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. शरद पवार म्हणाले होते की रोहितने कधीही पदाची अपेक्षा केली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणून आल्यानंतर रोहितने चांगलं काम केलं. पदाची अपेक्षा केली नाही. रोहितची पहिली पाच वर्षे तुमची सेवा करण्यासाठी आणि पुढची पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. याबाबत सुप्रिया सुळेंनीही असच एक वक्तव्य केलं आहे. शरद पवारांचा वारसा रोहित पवार चालवणार असतील तर त्यात मला काय हरकत असेल ? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले किंवा शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर माझी हरकत असण्याचं कारणच काय ? रोहितच का ? माझ्या वडिलांचा वारसा कुणीही चालवू शकतं. असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं आहे. कर्जत जामखेडमध्ये शरद पवारांनी रोहित पवारांविषयी जे वक्तव्य केलं त्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळेंनी हे उत्तर दिलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
अजित पवारांनीही चूक मान्य केली.
२०२३ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटला. अजित पवारांनी महायुतीत सहभागी होत शरद पवार यांच्या विरोधी भूमिका घेतली होती . त्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. यानंतर अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर खूप टीका झाली. तसंच लोकसभा निवडणुकीत बारामतीकर अजूनही शरद पवारांबरोबरच आहेत हे दिसून आलं. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा निवडून आल्या. त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर अजित पवारांनीही चूक मान्य केली.
(संग्रहित दृश्य.)
शरद पवारांचा वारसा आता रोहित पवार चालवणार ?
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. अशात शरद पवार यांनी रोहित पवारांबाबत जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रोहित पवार मुख्यमंत्री होणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. आता सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांनी माझ्या वडिलांचा वारसा चालवला तरीही माझी काही हरकत नाही असं म्हटलं आहे. याचाच अर्थ शरद पवारांचा वारसा हा आता आगामी काळात रोहित पवार चालवताना दिसतील.