मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात होतं. तसेच मोठ्या प्रमाणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र,गेल्या अडीच महिन्यांनंतर धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनमा दिला आहे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मागितला नव्हता. दरम्यान, संतोष देशमुख हत्येनंतर ७७ दिवसांनी या हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करतानाचे फोटो सादर केले आहेत. हे फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. तसेच वाल्मिक कराडला, त्याच्या टोळीतील गुंडांना कठोर शासन व्हावं, वाल्मिक कराडचे निकटवर्तीय धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी होऊ लागली होती. परिणामी धनंजय मुंडे यांनी आज त्यांचा राजीनामा सादर केला. त्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य केलंय.

Dhananjay Munde will resign from post of minister CM Devendra Fadnavis Ajit  Pawar | महाराष्ट्र: धनंजय मुंडे छोड़ेंगे मंत्री पद, CM देवेंद्र फडणवीस ने  इस्तीफा देने को कहा

संजय शिरसाट म्हणाले, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्या घटनेचा सर्वांनीच निषेध नोंदवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेवर भाष्य करताना सांगितलं होतं की या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होईल. कोणालाही माफी मिळणार नाही. गुन्हेगारांना कडक शासन होईल. आता या प्रकरणाचा तपास चालू आहे. सीआयडीने याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. आता याप्रकरणी सुनावणी होईल. या हत्याप्रकरणात जो कोणी आरोपी निष्पन्न होईल त्याला कठोर शिक्षा होईल. न्यायालय आरोपींना जी शिक्षा देईल ती शिक्षा आपल्याला मान्य करावी लागेल असे फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले होते.

Eknath Shinde close aide Sanjay Shirsat on Shiv sena and Shiv sena UBT  coming together Maharashtra | एकनाथ शिंदे के करीबी संजय शिरसाट का बड़ा  बयान, बोले- 'शिवसेना के टूटने का आज(संग्रहित दृश्य.)

काही संशयास्पद आढळलं तर…

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ म्हणाले कि या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे नाव घेतलं जात होतं. धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा आका आहे वगैरे नावं घेतली जात होती. धनंजय मुंडे देखील आरोपी आहेत, असं चित्र रंगवलं जात होतं. मात्र आता त्यांनी तब्येतीचं कारण दाखवत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या प्रकरणावर आता पडदा पडला आहे. तब्येतीचे कारण देऊन राजीनामा दिला असला तरी या प्रकरणात ज्याचा कोणाचा हात असेल त्याला कठोर शिक्षा होईल हे निश्चित आहे. धनंजय मुंडे यांनी आता राजीनामा दिला आहे. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास चालू आहे. या तपासात काही संशयास्पद आढळलं तर धनंजय मुंडेंवरही कारवाई होईल अस त्यांनी म्हंटले आहे.