SHAHRUKH KHAN MANNAT HOUSE NEWS : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा २०२३ ला चांगलाच चर्चेत होता.जवान,पठाण,डंकी या सिनेमांमधून शाहरुख खानने चाहत्यांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित केले होते. शाहरुख खानला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून तो बॉलिवुडवर राज्य अरातोय. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी आजही सिनेमागृहात मोठ्या संख्येने गर्दी होते. शाहरुख खानचे कपडे, त्याने वापरलेले घड्याळ, बुट हा देशभरात चर्चेचा विषय ठरतो. शाहरुखचा मन्नत हा बंगला तर देशभरात नावाजलेल्यापैकी एक आहे. या घरापुढे फक्त एक फोटो काढण्यासाठी शेकडो लोक रोज मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करतात. दरम्यान, आता शाहरुख खानला त्याचा हाच मन्नत बंगला सोडावा लागणार आहे. आपली पत्नी आणि मुलांसह २४ लाख रुपयांच्या रेंटेड अपार्टमेंटमध्ये शाहरुखला राहावे लागणार आहे.
(संग्रहित दृश्य.)
कर्मचाऱ्यांना घेऊन शाहरुख भाडोत्री घरात ?
शाहरुख खानचा मन्नत हा बंगला नेहमीच चर्चेत असतो.गेल्या साधारण २५ वर्षांपासून तो या घरात आपल्या कुटुंबासोबत राहतोय. शाहरुख खानची पत्नी तथा दिग्दर्शक गौरी खान ही उत्कृष्ट इंटेरियर डिझायनर आहे. तिनेच या घराला सजवलेले आहे. दरम्यान, आता शाहरुख खान लवकरच नवीन घरात स्थलांतर करणार आहे, असे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो लवकरच एका चार मजली अपार्टमेंटमध्ये राहायला जाणार आहे. शाहरुख खानसोबत त्याचे कर्मचारी देखील या नवीन अपार्टमेंटमध्ये स्थलांतरित होणार आहेत. यात त्याच्या सुरक्षा रक्षकांचाही समावेश असेल. शाहरुखने हे अपार्टमेंट पुढच्या तीन वर्षांसाठी भाडोत्री घेतल्याचे म्हटले जात आहे. मन्नत बंगल्याच्या डागडुजीसाठी दोन वर्ष लागण्याची शक्यता असल्याचे समजते. त्यामुळे या काळात शाहरुख खान याच नव्या अपार्टमेंटमध्ये राहणार आहे अशी प्राथमिक माहिती आहे.
(संग्रहित दृश्य.)
परवानगी घ्यावी लागणार ?
एचटीच्या रिपोर्टनुसार शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार आहे. या दुरुस्तीच्या कामाला बराच वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या घराची दुरुस्ती करायची असेल तर शाहरुख खानला कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. शाहरुखचा मन्नत बंगला हा ग्रेड-३ हेरिटेज स्ट्रक्चर आहे. त्यामुळे या घरात काहीही बदल करायचा असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागते. या घराचे काम आगामी काही महिन्यांत सुरू होणार आहे. त्यामुळेच शाहरुख त्याच्या कुटंबासोबत लवकरच दुसरीकडे राहण्यासाठी जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होते. शाहरुख खान नव्या ठिकाणी रेंटवर त्याच्या परिवारासोबत त्याची पत्नी गौरी, सुहाना, अबराम आणि आर्यन या तिन्ही मुलांचा समावेश असेल. या सर्वांसाठी शाहरुख खानने चार मजली अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखने चित्रपट निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी यांच्याकडू हे अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे.