By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेच्या मेंदूला मुंग्याच…! पहाटेच्या शपथ विधीपासून आज पर्यंत जनता ह्यांग ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेच्या मेंदूला मुंग्याच…! पहाटेच्या शपथ विधीपासून आज पर्यंत जनता ह्यांग ?
महाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेच्या मेंदूला मुंग्याच…! पहाटेच्या शपथ विधीपासून आज पर्यंत जनता ह्यांग ?

Last updated: 2023/12/15 at 6:09 PM
By BHAIYYASAHEB BOXER 11 Min Read
Share
SHARE

महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेच्या मेंदूला मुंग्याच…!

कोणी एकनिष्ठ नेता देता का,एकनिष्ठ नेता ….

एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे हाल, निष्ठतेविना अब्रू चव्हाट्यावर  ..!

 

राजकारण म्हटलं कि न समजणारा विषय आहे अस जुनी लोक म्हणायची तर राजकारण दलदल आहे असही काही मंडळी म्हणायची परंतु राजकारण नकोच रे बाबा अस काही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणतात. कोण कधी काय करेल,कोण कोणाचा हात धरेल,कोणाचा पाय ओढेल याचा सध्या तरी ताळमेळ लागत नाही.

शिंदे,फडणवीसांची भाजी म्हणल तर डोक्यात मुंग्याच येणार आणि त्यात अजित पवारांची फोडणी मग काय कदाचित शिंकून शिंकून नको नको होण्यासारखच असावे.कारण महाराष्ट्रात सध्या काय चाललय आणि भविष्यात काय चाललाय याचा अंदाच तज्ञसुद्धा लाऊ शकत नाहीत. 

 

प्रथमच महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेचा मेंदू पहाटेच  बंद पडला.

 २३ नोव्हेंबर २०१९ ही सकाळ महाराष्ट्रातल्या राजकारणात कुणीही विसरणार नाही. याच दिवशी पहाटेचा शपथविधी पार पडला होता. भाजपा आणि शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटण्यावरुन झालेला वाद विकोपाला जाऊन शिवसेनेने भाजपाऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरु होत्या. त्याच्या बातम्या येत होत्याच. अशातच २२ नोव्हेंबर २०१९ च्या संध्याकाळी अजित पवार हे शरद पवार उपस्थित असलेल्या बैठकीतून तडकाफडकी निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिसलं ते पहाटेच्या शपथविधीचं दृश्य. त्यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारींच्या उपस्थितीत कुणाला कसलीच कुणकुण लागू न देता अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेला चार वर्षे उलटली आहेत. मात्र आजही हा दिवस आला की पहाटेच्या शपथविधीची आठवण होतेच. 

 

८० तासात हवेतल सरकार आदळल.? 

एवढी कसरत करून अवघ्या कोट्यावधी जनतेचा मेंदू बंद पाडून पहाटेचा शपथविधी झाला तरीही ते फडणवीस / पवार  सरकार ८० तासांहून जास्त काळ टिकू शकल  नाही. मात्र राजकारणात काही काही घटना अशा असतात ज्या काळाच्या पाटीवर आपलं अस्तित्व कायमचं अधोरेखित करुन जातात. पहाटेचा शपथविधी ही अशीच घटना ठरली. शरद पवारांनी अजित पवारांसह गेलेल्या सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि अजित पवार हे त्या मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री झाले. हा सगळा घटनाक्रम महाराष्ट्राने पाहिला. सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे विळ्या भोपाळ्यासारखं सख्ख्य असलेले पक्ष एकत्र येतील असं कुणालाही खरंतर वाटलं नव्हतं. मात्र तो प्रयोगही घडला. मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग जितका जोरदार आणि धक्कादायक होता.

 

 

धर्मवीर प्रदर्शित करून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची डरकाळीच गायब केली. ? 

१९ जून २०२२ रोजी शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा झाला आणि तिसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जानेवारी २०२२ ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वांत मोठं बंड झालं.महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी मतदान पार पडल्यानतंर एकनाथ शिंदे १२ आमदार घेऊन सुरतमध्ये पोहोचले. तिथून एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीत गेले. शिंदे गटातल्या आमदारांची संख्या ४६ वर पोहोचली. यात एकट्या शिवसेनेतील 40 आमदार होते.दरम्यानच्या काळात शिवसेनेनं उरलेल्या आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.

भाजपसोबत सत्तेत स्वार…. ठाकरेंची झाली सेनाच गार ….

एकनाथ शिंदेंच्या यशस्वी झटक्यानंतर उद्धव ठाकरेंना  रामराम ठोकावा लागला.  मुख्यमंत्रिपद गेलं शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढत गेली. तसंच, सत्तास्थापनेनंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्ष चिन्हही एकनाथ शिंदेंना मिळालं. तसंच, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारही स्थिर झालं.

 

पुतण्याचा चुलत्यावर वार …? जनतेच्या विचारांच्या पार ….?

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत बंड झाले होते. अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटासोबत युती करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत इतर नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या घटनेनं राजकारणात खळबळ उडाली आहे. २०२३ मध्ये अजित पवारांनी पुन्हा महायुतीसह सत्तेत येणं. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास कधीही विसरणार नाही. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर या सगळ्या घटनेबद्दल अजित पवार यांनी सूचक मौन बाळगलं होतं. त्यांना कधीही प्रश्न विचारला तर ते नो कमेंट्स म्हणायचे. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या वेगाने सरकार पडलं त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांचं बंड मोडून काढलं अशाही राजकीय चर्चा झाल्या आणि रंगवल्या गेल्या.

 

शिवसेनेच्या १६ आमदार अपत्रातेवर निकालासाठी  सुप्रीम वाढ.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलनंब प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात २१ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता. सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा दिला आहे. राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. राहुल नार्वेकर यांच्यावतीनं तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता. राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडे बाजू मांडताना २० डिसेंबरपर्यंत निर्णय सुरक्षित ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टातील यापूर्वीच्या सुनावणीत या बाबतचा अंतिम निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांना दिला होता. आता, राहुल नार्वेकर यांना १० दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.


१० जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यावा लागणार

राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात २१ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास मुदतवाढ मागण्यात आली होती. राहुल नार्वेकर यांच्या मागणीवर सुप्रीम कोर्टानं १० दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळं आता शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीपर्यंत लागणार आहे.

 

 

 

मुंबई आणि नागपूरमध्ये सुनावणी

राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात यापूर्वी झालेल्या सुनावणीत शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्यासाठी ३१ जानेवारीची मुदत मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं ३१ डिसेंबरची मुदत दिली होती. यानंतर राहुल नार्वेकर यांनी मुंबईत आणि नंतर हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर नागपूरमध्ये सुनावणी घेतली होती. यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत नागपुरात सुनावणी सुरू आहे. शनिवारी खासदार शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात आली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शेवाळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावर शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे उभय पक्षांत शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. सुमारे चार तास सुनावणी चालल्याची माहिती आहे. शिवसेना खासदारांची २५ जून, २०२२ पूर्वी बैठक झाली होती. त्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आल्याने त्यांच्यासोबत निवडणूक सोबत लढवावी. उद्धव ठाकरे यांना सदस्यांच्या भावना पोहोचवल्या असता त्यांनी ‘कळवतो’ असे सांगितले, असा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केला.येत्या मंगळवारपर्यंत उलटतपासणी पूर्ण करा, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. १८ तारखेपासून युक्तिवाद सुरू होऊन २३-२३ तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. उलटतपासणी अद्याप सुरू असल्याने यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे खासदार राहुल शेवाळे यांनी  सांगितले. त्यांची परत उलटतपासणी होणार असून दीपक केसरकर आणि उदय सामंत यांचीही उलटतपासणी होणार आहे.

 

आघाडीसोबत जाण्यास विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेला विकास आणि त्यांच्या चेहऱ्यांमुळे पक्षाच्या उमेदवाराला भरघोस मते मिळाली. ‘दुकान बंद करेन पण काँग्रेससोबत जाणार नाही’, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यामुळे काँग्रेस वा महाविकास आघाडीसोबत जाण्यास विरोध असल्याचे उद्धव ठाकरे यांना कळवले होते, असे शेवाळे म्हणाले. त्यावर ‘लेखी कळवले का’, असा सवाल कामत यांनी केला, यावर शेवाळे यांनी ‘नाही’, असे उत्तर देत मौखिक सांगितल्याचे स्पष्ट केले.

 

 सुरतलाच का गेले ?  शिवाजीराजे सुरतेला गेले होते, त्यामुळे मी गेलो!

 सुरत हे छान शहर आहे, असे ऐकले होते. शिवाजी महाराज तेथे गेले होते त्यामुळे मीसुद्धा गेलो, असे उत्तर शिवसेनेचे मुख्य प्रतोद (शिंदे गट) भरत गोगावले यांनी उलट तपासणी दरम्यान दिले. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत मुंबईत सुरू असलेली उलट तपासणी सध्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष सुरू आहे. यात मंगळवारी शेवाळे यांची उर्वरित साक्ष नोंदविण्यात आली. उद्धव ठाकरे गटाचे वकील वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत यांनी यावेळी गोगावले यांची उलटतपासणी घेतली. शिंदे गटाचे प्रतोद या नात्याने त्यांची साक्ष महत्त्वाची समजली जाते.

कामत यांनी विचारले, २० जून रोजी राज्यातून बाहेर पडताना तुम्ही सुरत शहरच का निवडले ? यावर गोगावले म्हणाले, शिवाजी महाराज सुरतेला गेले होते त्यामुळे मीसुद्धा गेलो. ४ जुलै २०२२ रोजी हॉटेल प्रेसिडेंट मध्ये ४० आमदार उपस्थित होते. आपण त्यांना स्वत:हून व्हीप त्यांच्या हाती दिला. मात्र उर्वरित १५ आमदारांना व्हॉट्सॲपवरून व्हीप पाठविण्यात आल्याचे गोगावले यांनी कबूल केले. हा व्हीप ९०४९५५५०७० या क्रमांकावरून पाठविण्यात आला होता. मात्र हा क्रमांक आपल्या नावाने नोंदणीकृत नसून आपला मित्र संतोष कदम यांच्या नावे आहे, असेही गोगावलेंनी मान्य केले. आम्ही सगळे गुहावटीला स्वत:च्या पैशांनी गेलो. कामाख्या देवीच्या दर्शनाला स्वत:च्या पैशाने जावे, असे वाटल्याने आमच्या तिकीटाचे पैसे आम्ही स्वत: भरले, असे गोगावले यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना पक्षात २०१३ ते २०१८ या काळात झालेल्या पक्षांतर्गत निवडणुका नियमानुसार झाल्या नव्हत्या, असे उत्तर उलटतपासणीत शिवसेनेचे (शिंदे गट) राहुल शेवाळकर यांनी दिले. मात्र २०१८मध्ये आदित्य ठाकरे यांची युवा सेना प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल खुद्द शेवाळे यांनीच ट्विट केले होते, असे निदर्शनास आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे. त्यामुळे शेवाळेंना त्यांचे ट्विट महागात पडणार की काय आणि यामुळे त्यांच्या साक्षीत विरोधाभास निर्माण होणार काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

सत्तांतराच्या घटनाक्रमादरम्यान २१ जून रोजी आपल्यावर हल्ला झाला होता, अशी माहिती यावेळी दिपक केसरकर यांनी दिली. ‘जेव्हा मी माझ्या कारकडे गेलो तेव्हा माझ्या कारवर हल्ला झाला आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांनी घेरले आणि कोणीतरी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी माझी कार जाऊ दिली. पण माझ्या मागे दोन गाड्या होत्या. त्या गाड्या माझ्या राहत्या घराजवळ पार्क केल्या होत्या. मी अनिल देसाई यांना फोन केला. त्यांना सांगितले की त्या गाड्या तिथून हटवा. मला सुरक्षित वाटत नाही आणि त्या गाड्या त्याच ठिकाणी राहिल्या तरी मला माझी काम पार पाडताना सुरक्षित वाटणार नाही. मी पत्रकार परिषद बोलावतो. त्यांना या घटनेबद्दल सांगतो असे मी देसाईंना सांगितले होते, अशी माहिती यावेळी केसरकरांनी दिली.

या प्रकरणी बच्चू कडुंची साक्ष नोंदविली जाणार होती. मात्र काही कारणांस्तव ते हजर राहू न शकल्याने त्यांची साक्ष नोंदविण्यातच आली नाही. मंगळवारी साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया संपुष्टात आली. आता १८ ते २० डिसेंबर दरम्यान दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद होणे अपेक्षित आहे. दोन्ही पक्षांकडून लेखी व तोंडी दोन्ही स्वरुपात युक्तिवाद होणार आहे.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article भाजपच्या खासदारांनी दिले पास …… अन आरोपी घुसले आत….! संसदेचे वातावर चिघळवनाऱ्यासाठी सरोदे लढणार तर सरकारने माफ करण्याची आंबेडकरांची मागणी
Next Article किंग खानच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीला ५६ वर्षीय अभिनेत्याच्या बाळाची आई व्हायचं होत.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?