Sanjay Raut Allegations on Minister Jaykumar gore of Women Molestation like Swargate Rape Case | "स्वारगेटसारखा प्रकार जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय", महिला विनयभंगप्रकरणी ...(संग्रहित दृश्य.)

आपल्या कल्पनेपलिकडे यांचे काळे धंदे.

शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले स्वारगेटमध्ये जो प्रकार (बलात्कार) घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय. शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला. यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती  पुढील काही दिवसांत विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं आहे. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसले पाहिजेत. ही सर्व रत्नं त्यांनी एकदा तपासली पाहिजेत.दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी आणखी एका मंत्र्यावर आरोप केला आहे. ते म्हणाले राज्याच्या मंत्रिमंडळातील उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन बळकावली आहे. आपण अशी कल्पनाही करू शकत नाही. आपल्या कल्पनेपलिकडे यांचे काळे धंदे चालू आहेत. काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी वाढत चालली आहे.