(संग्रहित दृश्य.)
पत्नीचा गळा आवळून हत्या…
उत्पला हिप्परगी ही महिला मुळची पश्चिम बंगालच्या नैहाटी गावात राहणारी होती. २५ वर्षांपूर्वी ती पती आणि मुलाला सोडून मुंबईला आली होती. त्यानंतर एका बारमध्ये ती काम करत होती. त्या बारमध्ये काम करणार्या हरिश हिप्परगी याच्याबरोबर तिची ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी लग्न केले. दरम्यान बार बंद झाल्यानंतर हरिशने इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आणि ते मुंबई सोडून नालासोपारा येथे राहण्यासाठी आले. त्यांना २२ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. दरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक वाद वाढले. उत्पला गावी जात होती आणि ४-४ महिने गावी मुक्काम करायची. ती मुलाला घेऊन सोडून जाण्याची धमकी देत होती. त्यामुळे वाद विकोपाला गेला होता. अखेर ८ जानेवारीच्या रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला आणि हरिशने गळा आवळून तिची हत्या केली.