राम मंदिराच्या उद्घाटनाला येऊ नका अशी लालकृष्ण आडवाणींना विनंती का केली ?
भारत देशात सध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरु आहे, भाविक भक्त उद्घाटन कार्यक्रम कसा संपन्न होईल त्या कार्यक्रमाल सहकुटुंब कसे साक्षीदार होता येईल याच्या प्रतीक्षेत आहेत. १५ जानेवारीपर्यंत तयारी पूर्ण केली जाईल आणि प्राणप्रतिष्ठापनेची पूजा १६ जानेवारीपासून सुरू होईल आणि २२ जानेवारीपर्यंत चालू असेल अशी मंदिर व्यवस्थापनाकडून प्राथमिक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच या अभिषेक सोहळ्यात अनेक दिग्गज मान्यवरांना आमंत्रण दिले आहे. मात्र मंदिराच्या ट्रस्टने सांगितले की अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे उपस्थित राहणार नाही. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले की दोघेही या कुटुंबातील वरिष्ठ आहेत आणि त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना न येण्याची विनंती करण्यात आली होती जी दोघांनीही मान्य केली होती. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
किती तारखेला सुरुवात होणार आणि किती तारखेपर्यंत विधी. ?
सर्व तयारी १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. प्राण प्रतिष्ठा १६ जानेवारीला सुरु होईल. २२ जानेवारीपर्यंत हे विधी सुरु राहतील असं राय यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी कोणा-कोणाला निमंत्रित केलय, त्याची माहिती राय यांनी दिली. प्रकृती आणि वय या कारणांमुळे आडवाणी आणि जोशी कदाचित प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार नाहीत, असं ते म्हणाले. लालकृष्ण आडवाणींच वय आता ९६ आणि मुरली मनोहर जोशी ९० वर्षांचे आहेत.
१५० संत सहभागी होणार.
तीन सदस्यांची टीम बनवण्यात आली आहे. त्यांनी माजी पंतप्रधान देवेगौडा यांना कार्यक्रमाच निमंत्रण दिलं. शंकराचार्य आणि जवळपास १५० संत कार्यक्रमात सहभागी होतील अशी माहिती राय यांनी दिली. देशातील महत्त्वाची मंदिर जसं की, काशी विश्वनाथ, वैष्णव देवी आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
बॉलिवूड आणि उद्योग जगतातून हजेरी लागणार.
दलाई लामा, योग गुरु बाबा रामदेव, सिने अभिनेता रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, मधुर भांडारकर, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, इस्रोचे संचालक निलेश देसाई आणि अन्य मान्यवरांना उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
९० वर्षांच्या देवे गौडांचं वेलकम ,
८९ वर्षांच्या मनोहर जोशींना गर्दीकम ?
अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे उपस्थित राहणार नाही.आमंत्रण समितीने सांगितले कि वयाच्या दृष्टीने लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी येऊ नये अशी विनंती आम्ही केली आहे. मग माजी पंतप्रधान देवे गौडा १८ मे १९३३ चे म्हणजे ९० वर्षांचे आहेत तर मुरली मनोहर जोशी हे ५ जानेवारी १९३४ चे म्हणजे ८९ वर्षांचे आहेत.भाजपचे जेष्ठ नेते असलेले लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना येऊ नका म्हणून वयाचे तब्बेतीचे कारण देऊन भारतीय जनता पार्टी डावलत असल्याचे खासगीत बोलले जात आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
देवेगौडा हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान आहेत. जून १९९६ ते एप्रिल १९९७ ह्या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिलेले देवे गौडा १९९४ ते १९९६ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. ह्याखेरीज त्यांनी आजवर भारत सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषवली आहेत.देवे गौडा यांनी देशाच्या मोठ्या पदांवर काम केले आहे.त्यांना देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
सामाजिक आर्थिक विकास व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे कट्टर समर्थक असलेल्या श्री. एच. डी. देवेगौडा यांचा जन्म १८ मे १९३३ रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनारासिपुरा तालुक्यात असलेल्या हरदनहल्ली गावात झाला.सिविल इंजिनीरिंग पदविका धारक श्री. देवेगौडा यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. १९५३ साली त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला व १९६२ पर्यंत ते या पक्षाचे सदस्य राहिले. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचे सदस्य असलेल्या श्री. देवेगौडा यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील समस्या बघितल्या होत्या त्यामुळे त्यांनी शेतकरी, वंचित शोषित लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला.
लोकशाही व्यवस्थेतील तळागाळातील घटकांशी संबंध ठेवणाऱ्या श्री. देवेगौडांनी यथावकाश राजकीय यश प्राप्त केले. अंजनेय सहकारी संस्थेचे अध्यक्ष व होलेनारासिपुरा तालुक्याच्या तहसील विकास बोर्डच्या सदस्याच्या रुपात त्यांनी लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. त्यांनी नेहमी असमानताविरहीत समाजाचे स्वप्न बघितले.२८ व्या वर्षी श्री. गौडा अपक्ष म्हणून निवडणूक लढले व १९६२ मध्ये कर्नाटक विधानसभेचे सदस्य बनले. विधानसभेचे वक्ते असताना त्यांनी सर्वांना प्रभावित केले. होलेनारासिपुरा मतदारसंघातून चौथ्या (१९६७ -१९७१), पाचव्या(१९७२-१९७७)व सहाव्या (१९७८-१९८३) विधानसभेवर ते सलग निवडून आले.